काँग्रेसची अर्थसंकल्प पुढे ढकलण्याची मागणी

January 5, 2017 12:54 PM0 commentsViews:

congres arth

05 जानेवारी : संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 फेब्रुवारी रोजी घेण्याचा निर्णय मोदी सरकारने जाहीर केला खरा पण या अधिवेशनाला विरोध वाढत चाललाय. यावेळी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात 5 राज्यात होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतदारांना खूश करण्याचे प्रयत्न केले जाण्याची शक्यता काँग्रेस पक्षाने व्यक्त केलीय. त्यामुळे हा अर्थसंकल्प पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगाची भेट घेणारे.

या भेटीत हे अधिवेशन पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येईल. आता निवडणुका आणि अधिवेशन अशा कात्रीत केंद्र सरकार सापडलंय. अशात काँग्रेसच्या या मागणीची निवडणूक आयोग दखल घेतो का तेही पहावं लागेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close