सत्यपाल यांचा बागवेंवर आरोप

May 21, 2010 9:28 AM0 commentsViews: 9

21 मे

पुण्याचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग आणि गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्यातला वाद आता अंतिम टप्प्यात आला आहे. खरे तर पुण्यात पोलीस चौक्या सुरू करण्याच्या मुद्दयावर या दोघांमध्ये संघर्ष सुरू झाला होता.

या चौक्या सुरू करण्याबाबतचे निर्देश 31 डिंसेबरमध्ये पुण्यात सर्वपक्षीय बैठकीत दिले होते. मात्र मार्च महिन्यात पोलीस महासंचालकांना सत्यपाल सिंग यांनी पत्र लिहिले होते.

त्यात म्हटले आहे, या पोलीस चौक्या भ्रष्टाचाराची ठिकाणे बनली आहेत. राजकीय पुढारी, स्थानिक गुंड प्रवृत्तीचे लोक हे दोन गटामधील प्रश्न पोलीस चौकीच्या स्टाफशी संगनमत करून मिटवून टाकतात. या मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो.

कुणाला कोठडीत टाकायचे किंवा बाहेर काढायचे यासाठी पुढारी मंडळी चौकीचा वापर करत आहेत. आता पोलीस चौक्या बंद केल्याने आणि पोलीस स्टेशनच्या पातळीवर काम गेल्याने पुढार्‍यांचा दरारा कमी झाला आहे. हीच बाब त्यांना खटकत आहे.

close