माझे पाय जमिनीवरच, भाजपप्रवेशाबाबतचं वृत्त खोटं -खोत

January 5, 2017 3:26 PM0 commentsViews:

Sadabhau khot

05 जानेवारी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय गोटात सुरू आहे. पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे भाजपाची वाट धरणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, सदाभाऊ खोत यांनी भाजपाप्रवेशाच्या बातम्या निराधार असल्याचं सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून लवकरच बाहेर पडणार असल्याची चर्चा फेटाळून लावली आहे.

माझ्यात कोणाताही बदल झालेला नसून आजही माझे पाय जमिनीवरच असल्याचं दाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या नेतृत्त्वाखाली एक सहकारी म्हणून काम करत आहे. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी जे करता येईल, ते करण्याचा प्रयत्न सरकार आणि मी चळवळीतला एक नेता म्हणून प्रमाणिकपणे काम करत आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, भाजपाने सदाभाऊ खोत यांना राजू शेट्टींशी कोणतीही चर्चा न करता अधिकची मंत्रिपदं देऊ केल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शेट्टी नाराज असल्याचं समजतंय. त्यावरून सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यातही बेबनाव असल्याचंही वृत्त आहे. पण हे वृत्त खोटं असल्याचा दावा राजू शेट्टी यांनी IBN लोकमतशी बोलताना केला. खोत यांना आगाऊ मंत्रीपदं मिळत असतील तर आम्हाला त्याचा अभिमान असल्याचं शेट्टी म्हणालेत. पण गेल्या काही दिवसांपासून शेट्टी आणि खोत यांच्यात मतभेद असल्याचं उघड झालंय. त्यामुळे येत्या काळात सदाभाऊ खोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतच राहणार की भाजपाप्रवेश करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close