पिंपरी चिंचवडमध्ये भाजप-राष्ट्रवादीत ‘फ्लेक्स वॉर’

January 5, 2017 4:05 PM0 commentsViews:

Pimpri posterwars

05 जानेवारी :  पिंपरी-चिंचवडमधलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये टोकाचं फ्लेक्स  युद्ध भडकलंय. आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या अनेक उमेदवारांनी फ्लेक्स लावून शहराला विद्रूप केलंय. कहर म्हणजे मोठ्या पक्षांनीही फ्लेक्स बाजी सुरू केलीय.

‘नको बारामती, नको भानामती, शहराची सत्ता देऊ आपल्या राम-लक्ष्मणाच्या हाती’ असं फ्लेक्स भाजपनं लावलंय. आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे या स्वघोषित राम-लक्ष्मण जोडीला बारामतीकरांच्या अंगावर सोडलंय. तर त्याला फ्लेक्सद्वारेच चोख उत्तर देत, राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील “निवडणुकांचे निकाल येता हाती, कळेल बारामती की भानामती” अशा आशयाचे फ्लेक्स लावलेत.

दरम्यान,  मोठ्या पक्षांमध्ये छेडल्या गेलेल्या ह्या फ्लेक्स वॉरचे पडसाद आता पिंपरी  शहरातही उमटायला लागल्याचीही चर्चा आहे. याच वादातून शहरातील काळेवाडीमधल्या तापकीर नगरमध्ये काही समाजकंटकांनी हातात लाकडाचे दांडके घेऊन तब्बल 16 गाड्यांची तोडफोड केली. तर चौकामध्ये लावलेले फ्लेक्सही फाडण्यात आलेत. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. या प्रकरणातल्या तीन आरोपींना वाकड पोलिसांनी अटक केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close