मुंबईने गाठली रणजी फायनल, पृथ्वी शॉची पदार्पणातच शतकी खेळी

January 5, 2017 4:45 PM0 commentsViews:

C0sJYARUcAAK14E

05 जानेवारी :  मुंबई टीमने तामिळनाडूचा पराभव करत रणजी ट्रॉफीची फायनल गाठलीय. पृथ्वी शॉच्या शानदार खेळीमुळे महाराष्ट्राच्या टीमला हा विजय मिळाला. मुंबई टीमने तामिळनाडूचा सहा विकेट्स राखून पराभव केला.  मुंबई टीमची रणजी फायनल मॅच आता गुजरातशी आहे.

मुंबईकर क्रिकेटरसिकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे पृथ्वी शॉने पदार्पणातच शतक ठोकण्याची कामगिरी केलीय. पृथ्वीने 174 बॉल्समध्ये 120 धावांची खेळी केली. यामध्ये 13 चौकार आणि एका षटकाचा समावेश होता. आपल्या शतकी खेळीने मुंबईला फायनलमध्ये पोहोचवण्याची कामगिरी पृथ्वी शॉनं केलीय.

राजकोटमध्ये झालेल्या या सेमीफायनलमध्ये मुंबईला विजयासाठी 256 रन्सची आवश्यकता होती. पृथ्वी पिचवर टिकून राहिला आणि त्याने एक टोक सांभाळत मोठी खेळी केली. त्यामुळे मुंबईला फायनल गाठता आली. 17 वर्षांच्या पृथ्वी शॉ ने प्रफुल्ल वाघेला, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव यांच्याशी यशस्वी भागीदारी केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close