वसई-विरार बससेवा सुरू, IBN लोकमतचा दणका

January 5, 2017 3:30 PM0 commentsViews:

05 जानेवारी : वसई-विरार महानगरपालिकेच्या हद्दीतील ग्रामीण भागातील एसटी सेवा एसटी महामंडळाने १ जानेवारीपासून बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला विरोध करण्यासाठी जनआंदोलन समिती, कॉंग्रेस, बहुजन विकास आघाडी आणि भाजपने 10 ते 12 गावातील ग्रामस्थांसोबत नालासोपारा एसटी आगारात ठिय्या आंदोलन केलं. पहाटे ५ वाजल्यापासून या 10 गावातले विद्यार्थी, नागरिक,महिला आगाराच्या आवारात ठाण मांडून बसले होते.

यात भुईगाव,गास,वसई गाव,रानगाव,कळंब,राजोडी,वाघोली,अर्नाळा,गिरिज या गावातील ग्रामस्थांचा समावेश होता.

आयबीएन लोकमतनेही ही बातमी लावून धरली. अखेर एसटी महामंडळानं नमतं घेत पुन्हा एकदा ही एसटी सेवा सुरू केली. त्यामुळे ग्रामस्थांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. आपल्या आंदोलनाची दखल घेतल्याबद्दल त्यांनी आयबीएन लोकमतचे आभार मानलेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close