आयुक्तांच्या खुर्चीवर डुक्कराचं पिल्लू!, सोलापूरात शिवसेनेचं अजब आंदोलन

January 5, 2017 6:54 PM0 commentsViews:

Solapur_PIG

5 जानेवारी : सोलापूरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांच्या खुर्चीवर डुक्कराचं पिल्लू ठेवून आंदोलन केलं.  सोलापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून डुक्करांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत चाललाय. अनेकदा वाहनांच्या मध्येच डुक्करं आडवी येतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. मोठ्या प्रमाणावर अपघातही होतात.  अनेक नागरिकांना डुक्कर चावल्याच्या घटनाही इथे घडल्यायत.

डुक्करांच्या समस्येचा निषेध करण्यासाठी आज युवासेना आणि शिवसेनेने डुक्करविरोधी आंदोलन केलं. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांच्या खुर्चीवर डुक्कराचं पिल्लू आणून ठेवलं. सोलापूरचे महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांच्या टेबलावर हे डुक्कराचं पिल्लू बसवण्यात आलं.

शिवसेनेच्या या अजब आंदोलनामुळे सोलापूर महापालिकेच्या आवारात एकच गोंधळ उडाला. या आंदोलनासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात इथे जमले होते. या प्रकारानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.  शिवसेनेच्या या डुक्करविरोधी आंदोलनाला नागरिकांचा मात्र पाठिंबा मिळाला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close