‘लैला’ने घेतले 16 बळी

May 21, 2010 9:55 AM0 commentsViews: 5

21 मे

तामिळनाडू, आंध्रच्या किनारपट्टीवर धडकलेल्या लैला वादळाने आत्तापर्यंत 16 बळी घेतले आहेत. तर सुमारे 40 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

वादळी पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक कोलमडली आहे. सध्या लैला 100 ते 110 किलोमीटर वेगाने आंध्रच्या वायव्य दिशेकडे सरकत आहे.

गुंटुर जिल्ह्याच्या बाप्ताळाजवळ संध्याकाळी 'लैला'ने धडक दिली आणि या जिल्ह्यासह शेजारच्या प्रकासम जिल्ह्यात हाह:कार उडाला. नेल्लोर जिल्ह्यात तीन, पूर्व गोदावरीत दोन तसेच कृष्णा आणि वैजिअंग्राम या जिल्ह्यांमध्ये वादळाने बळी घेतले आहेत.

लष्कराची नऊ हेलिकॉप्टर्स बचाव कार्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत. पण खराब हवामानामुळे ती उडूच शकली नाहीत. एकूण ११ शहरे आणि शेकडो गावे अंधारात बुडाली आहेत.

शेतकऱ्यांनाही वादळाचा जबर फटका बसला असून तयार भात वाहून गेला आहे. त्याशिवाय दीडशेहून जास्त गुलेढोरे दगावली आहेत.

कर्नाटक, ओरिसा, बंगालमध्ये इशारा

'लैला' आज कर्नाटकात धडकणार असून ओरिसा आणि बंगालमध्येही इशारा देण्यात आला आहे. पुढच्या दोन दिवसांत ओरिसातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

सध्या 'लैला' ओरिसाच्या गोलापूरपासून ५७० किमी अंतरावर स्थिरावले आहे. दोन दिवसात लैला प. बंगालच्या दक्षिणेकडे धडक मारेल असाही अंदाज आहे.

close