मुंबईत 31 जानेवारीला मराठा क्रांती मोर्चा

January 5, 2017 7:39 PM0 commentsViews:

maratha_morcha banner1
05 जानेवारी :   मुंबईत 31 जानेवारीला मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे. औरंगाबादमध्ये समन्वय समितीने हा निर्णय घेतला होता.  मुंबईतला मोर्चा हा सर्वात मोठा मोर्चा असेल. मरीन ड्राईव्ह ते आझाद मैदान असा हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाची रंगीत तालीम म्हणून मुंबईत सोमय्या मौदान ते विधानभवन अशी बाईक रॅली काढण्यात आली होती.

याआधी राज्यभरात आणि दिल्लीतही मराठा मोर्चे निघालेत. पण सगळ्यांचं लक्ष मुंबईतल्या मराठा मोर्चाकडे आहे. कोपर्डी घटनेचा निषेध आणि मराठा समाजासाठी आरक्षण या मागण्यांसाठी मराठा मोर्चे निघतायत. 2016 चं वर्ष या मोर्चांनी ढवळून निघालं होतं. आता मुंबईचा मोर्चा हा नव्या वर्षातला पहिला भव्य मोर्चा असणार आहे.

मराठा समाजाच्या मोर्चांसोबतच राज्यात ओबीसी, बहुजन आणि मुस्लीमधर्मियांचे मोर्चे निघतायत. या मोर्चांनंतर सरकारने ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय करण्याचा निर्णय घेतलाय. पण मराठा समाजाची आरक्षणाची मागणी पूर्ण होऊ शकलेली नाही. दुसरीकडे, कोपर्डी सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close