म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास, स्वस्तात मिळणार 1 लाख घरं

January 5, 2017 6:59 PM0 commentsViews:

MHADA121

05 जानेवारी :   म्हाडा वसाहत पुनर्विकास नियमांमध्ये सरकारने बदल केले आहेत. यामुळे घाटकोपर, गोरेगाव, विक्रोळी या उपनगरातल्या म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. या नव्या नियमामुळे दोन हजार स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त आकारमानाच्या प्लॉटला वाढीव एफएसआयही मिळणार आहे. यापूर्वी 3 एफएसआय होता आणि आता अधिक एक म्हणजे चार एफएसआय मिळणार आहे.

या वाढीव एफएसआयमध्ये जी घरं बांधून तयार होतील त्यानुसार म्हाडाची स्वस्त किंमतीतली जवळपास 1 लाख घरं उपलब्ध होतील, असा अंदाज आहे. गेल्या आठ वर्षांपासून म्हाडाच्या या वसाहतींचा पुनर्विकास रखडला होता. यामुळे आता 56 म्हाडा वसाहतींची पुनर्बांधणी करता येणार आहे.

सध्याच्या काळात म्हाडा किंवा एसआरए योजनेअंतर्गत बिल्डर सरकारला घरं बांधून देत होते. पण आता मात्र त्याऐवजी बिल्डर सरकारला प्रिमियम देणार आहेत. त्यामुळे छोट्या आकाराची घरं म्हाडाला मिळणं कठीण होईल. 2 हजार चौ.मी. पेक्षा मोठ्या प्लॅटवर मात्र 1 एफएसआय वाढवून मिळाला आाहे. त्यातून तयार होणारी घरं बिल्डरांकडून म्हाडाला विकत घ्यावी लागणार आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close