‘चंद्रपूरच्या विकासाची नवी सुरुवात’

January 5, 2017 9:05 PM0 commentsViews:

05 जानेवारी : टाटा ट्रस्ट आणि वनविभाग यांच्यात चंद्रपूरमध्ये सामंजस्य करार झालाय. रतन टाटा आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत या करारावर सह्या झाल्या. चंद्रपूरजवळ चिचपल्ली इथला बांबू संशोधन प्रकल्प टाटा ट्रस्ट विकसित करणार आहे.

ratan tata

या प्रकल्पातून स्थानिकांना प्रशिक्षण मिळेल. यात किमान कौशल्यावर आधारित रोजगार निर्मीती होणार आहे. वनविभागाने राज्यभरासाठी हेल्पलाईनही सुरु केलीय. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि रतन टाटा यांच्या हस्ते या हेल्पलाईनचं उदघाटन करण्यात आलंय.

अवैध वृक्षतोड, वन्यप्राण्यांची शिकार यासह वनविभागाशी निगडीत असलेल्या तक्रारी या हेल्पलाईनवर नोंदवण्याची सोय उपलब्ध होणार आहे. 1926 हा हेल्पलाईन नंबर आहे. तर ग्रीन आर्मी असं या हेल्पलाईनचं नाव आहे. यानिमित्ताने आयबीएन लोकमतचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा यांच्याशी खास बातचीत केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close