आमदार बच्चू कडू यांच्या ‘नांगर मोर्चा’वर पोलिसांचा लाठीमार

January 5, 2017 11:13 PM0 commentsViews:

05 जानेवारी : शेतमालाला योग्य भाव देण्याच्या मागणीसाठी बच्चू कडू यांनी काढलेल्या नांगर मोर्चाला पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे हिसांत्मक वळण लागलं आहे. या लाठीचार्जमध्ये 40च्या वर प्रहारचे कार्यकर्ते जखमी झालेत, यामध्ये 25 महिलांचा समावेश आहे. तर एक कार्यकर्ता गंभीर जखमी झालाय. अमरावतीच्या इर्विन हॉस्पीटलमध्ये या सर्व जखमींवर उपचार सुरू आहे. जवळपास 25 हजाराहून अधिक लोकांनी या मोर्चात हजेरी लावली होती.

bachu kadu12

या मोर्चाला बुधवारपर्यंत प्रशासनानं परवानगी दिली होती. मात्र काल पदवीधर मतदारसंघात लागलेली आचारसंहीता बघता, प्रशासनानं आयुक्त कार्यालावर मोर्चा काढता येणार नाही, असं सांगत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची परवानगी दिली. पण बच्चू कडू यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यलयाजवळ आल्यानंतर पोलिसांनी बॅरिकेट्स लावून अडवणूक केली. मात्र, शेतकऱ्यांनी हे बॅरिकेट्स हटवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी मोर्चात सहभागी झालेल्यांवर पाण्याचा वर्षाव केला आणि त्यानंतर अंदाधुंद लाठीमार केला. धक्कादायक म्हणजे लाठीमार करताना पोलिसांनी महिला आणि लहान मुलंही पाहिली नाहीत. यामध्ये मोर्चात सहभागी झालेल्यांमधील 40हून जास्त कार्यकर्ते जखमी झाले आहे.

पोलिसांच्या लाठीमाराचा निषेध म्हणून आमदार बच्चू कडू हे याच ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी, हक्कांसाठी काढलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीमार केल्याचा आमदार बच्चू कडू यांनी निषेध नोंदवला आहे. शिवाय, शेतकऱ्यांचा मोर्चा अशाप्रकारे दडपण्यासाठी पोलिसांनी सरकारच्या इशाऱ्यावर लाठीमार केल्याचा आरोपही आमदार बच्चू कडू यांनी केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close