ओम पुरी यांचं निधन

January 6, 2017 9:59 AM0 commentsViews:

om puri 03

06 जानेवारी : ओम पुरी यांचं वयाच्या 66व्या वर्षी निधन.गेली काही वर्षं ते सतत आजारी असायचे, आणि त्यामुळे त्यांनी कामंही कमी केली होती.

पुरी यांचं शिक्षण नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून झालं होतं.आक्रोश,अर्धसत्य, घातक, जाने भी दो यारोमधल्या त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. गंभीर भूमिकांबरोबरच त्यांनी विनोदी भूमिकाही केल्या.मालामाल विकली, हलचल, हेरा फेरी सारख्या विनोदी चित्रपटांमध्ये त्यांची भूमिका खास लक्षात राहिली.विशेष म्हणजे त्यांचा पहिला चित्रपट हा मराठी होता. घाशीराम कोतवाल या नाटकावर चित्रपट आला होता.तो त्यांचा पहिला चित्रपट होता.

आर्ट फिल्म चळवळीत त्यांचा मोठा वाटा होता.80च्या दशकात नसीरुद्दीन शहा, शबाना आझमी, स्मिता पाटील आणि ओम पुरी हे आर्ट सिनेमांसाठी ओळखले जायचे. टीव्ही मालिकांमधल्या त्यांच्या भूमिका लक्षात राहिल्या. तमस, भारत एक खोज, सी ह़ॉक्स सारख्या मालिकांमधून त्यांनी काम केलं.

त्यांच्या निधनानं सिनेसृष्टीत दु:ख व्यक्त केलं जातंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close