औरंगाबादमध्ये आज मुस्लिम समाजाचा मोर्चा

January 6, 2017 9:30 AM0 commentsViews:

muslim morcha @8.10 ftg.tra

06 जानेवारी : औरंगाबादमध्ये आज मुस्लिम समाजाचा मोर्चा आयोजित केला आहे.मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रमुख मुद्दा असला तरी अनेक हक्काच्या मागण्यांसाठी हा मोर्चा आहे.

मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या या मोर्चाला अनेक जाती धर्माच्या संघटना यांनी पाठिंबा दिला आहे.आज दुपारी 12 वाजता या मोर्चाला सुरुवात आमखास मैदानातून होईल.मोर्चाचा शेवट विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाजवळ होईल.

मुस्लिम समाजातील 3 मुली आपले निवेदन आयुक्तांना देतील.याच तीन मुली मोर्चाला उद्देशून भाषणही करतील.मोर्चा शांततेत पार पाडण्यासाठी जवळपास 6 हजार कार्यकर्ते तयार करण्यात आले आहेत.पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात ठेवण्यात येणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close