टीम इंडियाच्या कर्णधारपदी विराट कोहलीची निवड

January 6, 2017 4:43 PM0 commentsViews:

Virat Kohli

06 जानेवारी :  इंग्लंडविरुद्धच्या आगामी तीन एकदिवसीय मालिका, तसेच तीन टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली. महेंद्रसिंह धोनीने वन डे आणि टी-20 संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर विराट कोहलीकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता विराट कोहली कसोटी, वन डे आणि टी-20 टीमचा कर्णधार बनला आहे. मात्र धोणी हा वन डे आणि टी ट्वेंटी अशा दोन्ही टीम कायम असेल.

एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील सीनियर निवड समितीच्या बैठकीत भारतीय संघ जाहीर करण्यात आला.

विशेष म्हणजे सिक्सर किंग युवराज सिंहचं टीम इंडियामध्ये कमबॅक झालं आहे. युवराजचा वनडे आणि टी ट्वेंटी दोन्ही संघात समावेश झालाय. तर दिल्लीचा डावखुरा सलामीवीर शिखर धवनचा वन डे संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र हिटमॅन रोहित शर्मा दुखापतीमुळे संघात स्थान मिळवू शकलेला नाही. याशिवाय रॉयल चेलेंजर्स बंगळुरू या संघात विराटसोबत खेळणाऱ्या गोलंदाज यजुवेंद्र चहलचीही टी ट्वेंटी संघात निवड झाली आहे. तर 19 वर्षीय विकेटकीपर फलंदजा रिषभ पंतने भारताच्या टी ट्वेण्टी संघात स्थान मिळवलं आहे. याशिवाय आणखी काही तरूण खेळाडूंचं या संघातलं स्थानही आता निश्चित झालंय.

वन डे टीम:
विराट कोहली (कॅप्टन), महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), के. एल. राहुल, शिखर धवन, मनीष पांडे, केदार जाधव, युवराज सिंग, अजिंक्य रहाणे, हार्दीक पंड्या, आर. आश्विन, रविंद्र जडेजा, अमित मिश्रा, जसप्रित बुमरा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव

टी-२० टीम:
विराट कोहली (कॅप्टन), महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), मनदीप सिंह, के. एल. राहुल, युवराज सिंग, सुरेश रैना, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, युझवेंद्र चहल, मनीष पांडे, जसप्रित बुमरा, भुवनेश्वर कुमार आणि आशीष नेहरा


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close