आमदार हर्षवर्धन जाधव यांना सक्तमजुरीची शिक्षा

January 6, 2017 6:40 PM0 commentsViews:

harshavardhan jadhav

06 जानेवारी :  कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना औरंगाबादमध्ये पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी आज कोर्टाने एक वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

सहा वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे औरंगाबाद दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांना भेटायला जाऊ न देणाऱ्या आणि बंदोबस्तावर असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सूर्यकांत देवराव कोकणे यांच्या अंगावर आमदार हर्षवर्धन जाधव यांनी जीप घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. तसंच त्यांना मारहाण करून महिला पोलिसांनाही धक्काबुक्की केली होती.

 या प्रकरणी आमदार जाधव यांना एक वर्षाची सक्तमजुरी आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close