बीडच्या बाबतीत मुख्यमंत्री फक्त माझच ऐकतात, पंकजाताईंचा दावा

January 6, 2017 10:11 PM0 commentsViews:

Pankaja munde banner1

06 जानेवारी :  राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे पुन्हा एकदा वादात सापडण्याची चिन्हं आहेत. सत्ता म्हणजे काय हे पाहायचे असेल तर बीड जिल्ह्यातील कोणताही निर्णय मला विचारल्याशिवाय होत नाही. मंत्रीच काय, तर मुख्यमंत्रीदेखील माझाच सल्ला ऐकतात, असं वक्तव्य पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

नेकनूर इथे बुधवारी विविध विकासकामाच्या उद‌्घाटनाच्या कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं आहे.

बीड जिल्ह्याच्या मी तुमच्याशी गप्पा मारू शकत नाही. परंतु प्रत्येक तास, प्रत्येक क्षण विकासाच्या कारणी लावायचा आहे. मला विचारल्याशिवाय बीडला कोणताही मंत्री निधी देत नाही. याला म्हणतात सत्ता. मुख्यमंत्रीही एकदा म्हणतात, पंकजा मुंडे यांना विचारून घ्या. निधीची फाइल मुख्यमंत्री मला विचारूनच पाठवतात, असा दावाही त्यांनी केला.

यावेळी जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराचा पाढाही त्यांनी वाचला. आपले (भाजप) लोक मात्र कुठेही सह्या करतात, त्यांना खायचे कसे तेही कळत नाही, असंही पंकजा म्हणाल्या.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close