जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे महामार्ग बंद, जनजीवन विस्कळीत

January 7, 2017 2:09 PM0 commentsViews:

Snow fall in kashmir

07 जानेवारी :   काश्मीर खोऱ्यात यावेळेस उशिरानं सुरू झालेली बर्फवृष्टी आता भरात आलेली दिसतेय. कारण गेल्या दोन दिवसापासून शीमला आणि श्रीनगरमध्ये तुफान बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे काश्मीर खोऱ्याचा देशाशी संपर्क पूर्णपणे तुटलाय. तसंच श्रीनगरला असलेली हवाई सेवाही ठप्प झालीय.त्यामुळे तेथील जणजीवन विस्ळीत झालेले पहायला मिळत आहे.

शीमला, कुलू , कित्रोर इथंही बर्फवृष्टी झाल्याने अनेक पर्यटक अडुकन पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हिमाचल प्रदेशच्या बर्फाळ भागात बर्फ मोठ्या प्रमाणात पडतोय. काल श्रीनगरमध्ये विक्रमी बर्फवृष्टी झाली.त्यामुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूही मिळणे कठिण झाल्याने मोठया अडचणींचा सामना करावा लागतोय. तब्बल 4 इंचापर्यंतचा बर्फाचा खच रस्त्यांवर जमलेला होता. पुढच्या 48 तासापर्यंतही हवामान स्थितीत कोणतीही सुधारणा होणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

काश्मीरमध्ये बर्फ पडल्यानं जनजीवन जरी विस्कळीत झालेलं असलं तरी तशी स्थिती शिमल्यात नाही. शिमल्यात मात्र पर्यटकांसाठी ही बर्फवृष्टी मजा करण्यासाठी उपयोगाची ठरतेय. पण उत्तरेत होत असलेल्या ह्या बर्फवृष्टी मुळे महाराष्ट्रापर्यंत थंडीची लाट आहे. उत्तर भारतही थंडीमुळे बऱ्यापैकी गारठलाय तर महाराष्ट्राला हुडहुडी भरलीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close