‘टिंग्या’चे घर बांधून पूर्ण

May 21, 2010 12:28 PM0 commentsViews: 16

21 मे

'टिंग्या' फेम शरद गोयेकरचे घर अखेर बांधून पूर्ण झाले आहे. हे घर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बांधून दिले आहे.

शनिवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते हे घर शरदला देण्यात येणार आहे.

शरद गोयेकर या धनगर समाजातील बालकलाकाराला 2007 चा उत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार जाहीर झाला असताना दुसरीकडे त्याच्या घराची व्यथा 'आयबीएन-लोकमत'ने सर्वांपुढे मांडली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी सर्वात आधी टिंग्याला दीड लाख रोख व 750 स्क्वेअर फुटाचे घर बांधून देण्याची घोषणा केली होती.

त्यानुसार हे टिंग्याचे नवीन घर बांधून पूर्ण झाले आहे. 'शिवाई' असे या घराचे नामकरण करण्यात आले आहे. मनसे आमदार शिशिर शिंदे यांनी नुकतीच या घराची पाहणी केली.

close