सांगलीत कोपर्डीची पुनरावृत्ती, अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या

January 7, 2017 4:18 PM0 commentsViews:

rape_634565
07 जानेवारी  : कोपर्डीसारखीच भयानक घटना सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यामधील भिलवडीमध्ये घडली आहे. भिलवडीमध्ये एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून केल्याचा गंभीर प्रकार काल (शुक्रवारी) उघडकीस आला. या प्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी भिलवडीसह पाच गावात बंद पाळण्यात येऊन निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.

पलूस तालुक्यातील भिलवडी येथे एका १४ वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह शुक्रवारी सकाळी सापडला होता. यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा करून तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी मिरजेच्या वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला.

पोस्टमार्टम रिपोर्टनूसार, तिची जरी तोंड दाबल्याने गुदमरुन मृत्यु असला तरी मुलीच्या गुप्तांगावरील जखमावरुन तिच्यावर बलात्कार करून तिचा खून केला असल्याचं, डॉक्टरांनी सांगितलं आहे.

यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून चौघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, माळवाडी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गावात तणावाची परिस्थिती आहे. तर मन सुन्न करणाऱ्या या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी भिलवडी, माळवाडीसह परिसरातील गावात बंद पाळून मोर्चा काढण्यात आला आहे.  या मोर्चानंतर विविध राजकीय पक्षाचे कार्य करते आणि सामजिक कार्यकते या घटनेचा निषेध करण्यासाठी भिलवडी गावाला भेट देत आहेत. यामध्ये सांगलीचे खासदार संजय काका पाटील, कृषी मंत्री सदाभाऊ खोत, युवती राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष स्मिता पाटील, माजी मंत्री पतंगराव कदम यांचाही समावेश आहे.

दरम्यान, भिलवडी गावामध्ये पोलीस बंदोबस्त आहे तसा असून स्वता कोल्हापूर परीशेत्रीय पोलीस महानिरीषक विश्वास नागरे पाटील या घटनेची माहिती घेत आहेत. गावात तणाव पूर्ण शांतता आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close