गाडी चालवायला शिकणं आता महागल, शुल्कात पाचपट वाढ

January 7, 2017 4:50 PM0 commentsViews:

56386855

07 जानेवारी :    वाहन चालवण्याच परवाना काढायचा असेल, तर आता आधीपेक्षा पाचपट पैसे मोजावे लागणार आहेत. केंद्र सरकारने मोटार-वाहन विभागातील विविध शुल्कांमध्ये मोठी वाढ केली आहे. सुधारित शुल्क रचनेनुसार शिकाऊ परवान्यासाठी आता १५० रुपये मोजावे लागणार असून, स्मार्ट कार्ड नमुन्यात नोंदणी प्रमाणपत्रासाठी २०० रुपये अतिरिक्त शुल्क असेल.

याशिवाय इतर शुल्कांमध्येही वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच ड्रायव्हिंग टेस्टसाठी आधी 40 रूपये मोजावे लागत होते त्याएवची आता 200 रूपये फी आकारली जाणार आहे. तसंच, लायसनचे नुतनीकरण करायचे असेल तर 300 रूपयांसबोत 1 हजार रूपये अधिक भरावे लागणार आहे. नवीन फी दरानुसार मॅन्युअल फिटनेस टेस्टसाठी 600रूपये आणि ऑटोमॅटेड फिटनेस टेस्टसाठी 1 हजार रूपये भरावे लागतील.

शिकाऊ, पक्का पक्क्या परवान्याबरोबरच आंतरराष्ट्रीय चालक परवाना, मोटार ड्रायव्हिंग स्कूल, डुप्लिकेट परवाना, वाहनांचे फिटनेस शुल्क, पत्ता बदलणे, वाहनांचे पासिंग, ट्रेड सर्टिफिकेट अशा विविध शुल्कांमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. २९ डिसेंबरपासून हे दर लागू करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close