पोलीस पाटील विकताहेत दारू…

May 21, 2010 12:36 PM0 commentsViews: 126

21 मे

औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील सारोळा येथील पोलीस पाटलालाच महिलांनी दारू विकताना पकडले.

गेल्या अनेक महिन्यांपासून कन्नड तालुक्यातील अवैध दारू विक्री थांबविण्याची मागणी या महिला करत होत्या. मात्र याकडे पोलीस दुर्लक्ष करत होते.

अखेर महिलांनीच ही विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यात सारोळा गावचे पोलीस पाटील बाबुराव बावस्कर हे दारू विकताना पकडले गेले.

या महिला आणि गावकर्‍यांनी एकत्र येऊन या पोलीस पाटलांना ग्रामपंचायतीमध्ये बसवून ठेवले. यासाठी मनसेचे आमदार हर्षवर्धन पाटील आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

पोलीस आल्यानंतर दारू विकणार्‍या पोलीस पाटलावर गुन्हा दाखल करण्यात आला.

close