गोंदिया,नागपूरमधल्या 11 नगरपरिषदांसाठी मतदान सुरू

January 8, 2017 1:34 PM0 commentsViews:

NAGPUR ELECTION copy

08 जानेवारी : नगरपालिका निवडणुकीच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात गोंदिया आणि नागपुरातल्या अकरा नगरपरिषदांसाठी आज मतदान पार पडतंय.नागपुरातल्या काटोल, कामठी, सावनेर मोहपा आणि सावनेरमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेय. नागपूरमध्ये आतापर्यंत 21 टक्के तर गोंदियात 28 टक्के मतदान झालंय.

काटोल, खाप्यात राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल देशमुख विरुध्द त्यांचे पुतणे आमदार आशिष देशमुख असा सामना पहायला मिळतोय. तर सावनेर इथं सुनील केदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कामठीत चंद्रशेखर बानवकुळेंची तर गोंदियात कॉग्रेस, राष्ट्रवादी विरुध्द भाजप अशी तिहेरी लढत होताये.

आज होणाऱ्या मतदानासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विशेष खबरदारी घेण्यात आलीय. मतदारराजा नक्की कुणाला कौल देतो याची सर्वच राजकीय पक्षांना उत्सुकता आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close