संघर्षानंतर मुलायम सिंह पहिल्यांदाच लखनौ कार्यालयात

January 8, 2017 2:06 PM0 commentsViews:

 

mulayam - Copy

08 जानेवारी : अध्यक्षपदावरून दूर केल्यानंतर मुलायम सिंह यादव हे आज पहिल्यांदाच पक्षाच्या लखनौमधील मध्यवर्ती कार्यालयात आले. यावेळी शिवपाल यादव हेही त्यांच्यासोबत होते.अखिलेश समर्थकांनी लखनौच्या कार्यालयाचा ताबा आपल्याकडे घेतल्यानंतर समाजवादी पक्षातील संघर्ष टोकाला पोहोचला होता. त्यानंतर मुलायम समर्थक आणि अखिलेश समर्थक गटांनी निवडणूक आयोगाचे दरवाजे ठोठावत सायकल चिन्हावर आपला दावा सांगितला होता.

मात्र आज प्रत्यक्षात कार्यालयाला भेट देण्यापूर्वी मुलायम यांनी अखिलेश यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. त्यानंतरच त्यांनी पक्ष कार्यालयाला भेट दिल्याने त्यांना कोणताही विरोध झाला नाही.यावेळी मुलायम यांनी अखिलेश यांच्यासोबत कोणतेही मतभेद नसल्याचा पुनरूच्चार केला. तर आमचा वाद नेताजींशी नसून इतरांशी असल्याचं अखिलेश समर्थक खासदार नरेश अग्रवाल यांनी सांगितलं.त्यामुळे मुलायम यांची पक्ष कार्यालयाला दिलेली भेट फारसं वादळ निर्माण करू शकली नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close