विनायक मेटे यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

January 8, 2017 4:44 PM0 commentsViews:

mete

08 जानेवारी : भाजपकडून नाराज असलेल्या विनायक मेटेंनी काही वेळापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली.सेना-भाजपनं सोबत निवडणुका लढवाव्यात आणि घटकपक्षांनाही सोबत घ्यावं यासाठी ही भेट असल्याचं मेटेंनी सांगितलं.

जिल्हा परिषदा आणि 10 महापालिका निवडणुकांमध्ये आमची ताकद जिथं असेल तिथं आम्हाला जागा द्याव्यात अन्यथा आम्हाला वेगळा पर्याय निवडावा लागेल असा प्रस्ताव आपण भाजपला दिल्याचं मेटेंनी सांगितलं. भाजपने राज्यातल्या विषयामध्ये आम्हाला सहभागी करून घेतलं पाहिजे असंही मेटे म्हणाले.

उद्धव ठाकरे आणि विनायक मेटे यांच्या भेटीवर तर्कवितर्क सुरू आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close