उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद,निकालाची उत्सुकता

January 8, 2017 7:50 PM0 commentsViews:

election nag 1

08 जानेवारी : नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातल्या अकरा नगरपरिषदांसाठीचं मतदान संपलंय. नगरपरिषद निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सरासरी 67.36 टक्क्यांच्या आसपास मतदान झालंय. चौथ्या टप्प्यातल्या मतदानात 1 हजार 190 उमेदवारांचं आणि 92 नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालंय.उद्या 11 नगरपरिषदांचं भवितव्य ठरणार आहे.

नागपूर जिल्ह्यातल्या खापा, काटोल, कळमेश्वर, रामटेक या नगरपरिषदांसाठी मतदान झालं. तीन टप्प्यात भाजपला मोठं यश मिळालं. चौथ्या टप्प्यात तोही मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात काय निकाल लागतात याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

काटोलमधील भाजप आणि विदर्भ पक्षाच्या चरणसिंग ठाकुरांमध्ये झालेला राडा वगळता मतदान शांततेत पार पडलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close