लता मंगेशकरांना शिकवणारी शाळा जमीनदोस्त

May 21, 2010 12:50 PM0 commentsViews: 3

21 मे

गानसम्राज्ञी लता मंगेशकर सांगलीत ज्या शाळेत शिकल्या, ती महापालिकेची मुलींची शाळा क्रमांक – 11 जमीनदोस्त करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे शाळेची जागा बोगस ठराव करून खासगी विकासकाला दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी अनिल पाटील यांच्यासह या बोगस ठरावाचे अनुमोदक, सूचक आणि तत्कालीन महापौर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.

मुलींची ही शाळा 1918 पासून सुरू आहे. भारतरत्न लता मंगेशकर आणि त्यांच्या भगिनी मीना मंगेशकर यांनी या शाळेत शिक्षण घेतले आहे.

close