पवारांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला खिंडार, आझम पानसरे भाजपात

January 9, 2017 9:33 AM0 commentsViews:

Pansare BJP

09 जानेवारी :  पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक जोरदार धक्का बसला आहे. शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे  राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी महापौर आझम पानसरे यांनी काल (रविवारी) राक्षी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

अत्यंत गोपनीय पद्धतीने रविवारी रात्री 11.30 वाजता पानसरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवसस्थानी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. पानसरे यांचा भाजपमधील प्रवेश म्हणजे पिंपरी-चिंचवडमधील राजकारणाचा मोठा टर्निंग पॉईंट मानला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी महापालिका निवडणुकीची वाट बिकट बनली आहे.

पानसरे पिंपरी चिंचवडचे माजी शहराध्यक्ष होते. विधानपरिषदेची उमेदवारी न दिल्याने ते काहीसे नाराज असल्याचं बोलल जात होत. मात्र, आगामी महापालिकेसाठी पानसरे हे राष्ट्रवादीचा चेहरा होते. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पवारांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला खिंडार पडला आहे.  त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close