खेळाडूंबाबत बीसीसीआय नरम

May 21, 2010 1:01 PM0 commentsViews: 2

21 मे

भारतीय खेळाडूंना कारणे दाखवा नोटीस पाठवल्यानंतर बीसीसीआयने आता नरमीची भूमिका स्वीकारली आहे. त्यांनी या सगळ्या खेळाडूंना फक्त ताकीद देऊन सोडून दिले आहे.

सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार बोर्डाचे अध्यक्ष शशांक मनोहर यासंदर्भात कडक पावले उचलणार होते. पण बोर्डाच्या इतर सदस्यांनी मात्र त्यांना नरमाईची भूमिका घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आशियाई कपसाठी निवडण्यात येणार्‍या टीमवर याचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचे समजते.

युवराज, रोहीत शर्मा, आशिष नेहरा, झहीर खान, रविंद्र जडेजा आणि पियुष चावला या खेळाडूंना ही नोटीस पाठवण्यात आली होती. असे असले तरी यापुढे खेळाडूंनी मैदानावर आणि मैदानाबाहेर कसे वर्तन करायचे यासंदर्भात कडक आचारसंहिता जारी करण्याचा विचारही बीसीसीआय करत आहे.

यासाठी काही अनुभवी खेळाडूंची मदत घेण्यात येणार आहे. यापुढे गैरवर्तन करणार्‍या खेळाडूंवर कडक कारवाई करण्याचा इशारा बीसीसीआयने दिला आहे.