राज्यात हुडहुडी; साताऱ्यात नीचांकी तापमान

January 9, 2017 3:17 PM0 commentsViews:

FOG121

09 जानेवारी : राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे.  साताऱ्यात राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. साताऱ्यात राज्यात सर्वात कमी म्हणजेच  7.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर पुढील एका दिवसात किमान तापमान किंचित वाढणार असून, त्यानंतर पुन्हा थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला.

उत्तर भारतात थंडीची लाट आहे. तिथून गार वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत असल्याने गेल्या दोन दिवसांमध्ये किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा चार ते पाच अंश सेल्सिअसने कमी झाला होता. त्याच वेळी उत्तर महाराष्ट्रात कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव वाढल्याने किमान तापमान रविवारी दोन अंश सेल्सिअसने वाढले; पण सरासरीपेक्षा अद्यापही किमान तापमानाचा पारा कमी आहे. पुढील दोन दिवसांमध्ये याचा प्रभाव कमी होणार असल्याने पुन्हा शहर आणि परिसरात थंडीचा कडाका जाणवेल, असंही हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितलं.

दाट धुक्याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी दाट मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक मंदावली आहे. सुटीनंतर पुण्याहून मुंबईकडे व मुंबईहून पुण्याकडे परतणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसला आहे. रविवारी या मार्गावर दाट धूके होतं. परंतु सोमवारी रविवारपेक्षाही धुक्याचे प्रमाण अधिक आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेलगत असलेले महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे क्रिकेट स्टेडियम देखील या धुक्यात हरवून गेलं होतं. त्यामुळे, कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणुन वाहनचालकांनी काळजी घेण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close