प्रफुल्ल पटेलांनी गड राखला, पण ‘सिंह’ गेला !

January 9, 2017 3:54 PM0 commentsViews:

praful-patel4

09 जानेवारी : गोंदियातील तिरोडा नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला असून गड आला आणि सिंह गेला अशी अवस्था झालीये. राष्ट्रवादीने सर्वाधिक जागा जिंकूनही नगराध्यक्षपद गमाववं लागलंय. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या वर्चस्वाला इथं हादरा बसलाय.

तिरोडा नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठापणाला लागली होती. प्रफुल्ल पटेल यांनी प्रचारसभांचा धुराळा उडवला होता. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीने 17 पैकी 16 जागा जिंकत एकहाती सत्ता राखली होती. मात्र, यावेळी राष्ट्रवादीला चांगलाच धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेसला 9 जागांवर समाधान मानावे लागले. भाजपने यावेळी खातं उघडत चार जागा बळकावल्या आहे. तर शिवसेनेनं 2 जागांवर विजयी झाली आहे.

भाजपने चार जागा जिंकत नगराध्यक्षपदही पटकावले आहे. तिरोडा नगरपरिषद अध्यक्षपदी भाजपच्या सोनाली देशपांडे विजयी झाल्या आहेत. विशेष म्हणजे मागील निवडणुकीपेक्षा यावेळी राष्ट्रवादीच्या 17 जागांवर 9 जागांवर घसगुंडी झालीये. तिसऱ्या टप्प्यातही भंडारा आणि गोंदियामध्ये राष्ट्रवादीला पुरेपूर यश मिळालं नव्हतं. त्यानंतर आता प्रफुल्ल पटेल यांच्याच गडात राष्ट्रवादीला हादरा बसलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close