पुण्यात आईस शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल सुरू

May 21, 2010 1:08 PM0 commentsViews: 4

21 मे

पाचव्या आईस शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलला पुण्यात सुरूवात झाली आहे. तीन दिवस चालणार्‍या या फेस्टिव्हलमधे वेगवेगळ्या विषयांवरील विविध भाषांतील 30 शॉर्ट फिल्मस् दाखवल्या जाणार आहेत.

या फेस्टिव्हलमधील निवडक फिल्म्स झी सिनेमा या चॅनेलवर दाखवण्यात येणार आहेत.

टेबल मॅनर्स, मुंबईतील लोकल्स, गर्भपात, आयुष्याच्या धकाधकीत हरवलेले बालपण, सेझमुळे निर्माण झालेला पर्यावरणाचा प्रश्न अशा विषयांवरील या फिल्मस पाहण्यासाठी प्रेक्षकांनी एस. एम. जोशी हॉलमधे गर्दी केली होती.

या निमित्ताने शॉर्ट फिल्मस बनवणार्‍यांना तर व्यासपीठ मिळाले आहेच पण सिनेरसिकांसाठीही पर्वणी ठरली आहे. समर नखाते या महोत्सवाचे डायरेक्टर आहेत.

close