आवळा : मूर्ती लहान,कीर्ती महान

January 9, 2017 4:28 PM0 commentsViews:

09 जानेवारी : आवळा हा दिसायला लहान आहे मात्र तो शरीरासाठी फारच उपयोगी असतो.थंडीच्या दिवसांत तर त्याचे सेवन व्हायलाच हवे.कोणत्याही रुपात आवळा शरीरात गेला तरीही तो तितकाच उपयुक्त असतो.पाहूयात त्याचे काही उपयोग-

1.नियमितपणे आवळा शरीरात गेल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते.

2.रोज आवळा खाल्याने पचनक्रिया सुरळीत राहते.त्यात पाचक-तंतू असतात.त्यामुळे त्यातील आम्लाचा उपयोग पाचक-रसासारखा होतो.

3.यात अॅंटीऑक्सिडंट्स आणि व्हिटामिन सीचे प्रमाण जास्त असते.त्यामुळे त्याचा उपयोग केसाचा नैसर्गिक रंग कायम राहण्यासाठी होतो.तसंच त्यामुळे केस पिकणंही थांबतं.

4.आवळ्यात अॅंटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असल्याने कॅन्सरसारख्या रोगाला प्रतिबंध बसतो.

5.आवळ्याच्या सेवनामुळे शरीरातील मेटाबॉलिजम वाढते आणि ते शरीरातील वजन नियंत्रणात आणते.

6.यात अनेक औषधी गुणधर्म असतात ,त्यामुळे सौंदर्यप्रसाधनांमध्ये त्यांचा समावेश मोठ्या प्रमाणावर असतो.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close