मराठा मोर्चा निघू नये यासाठी मुख्यमंत्र्यांकडून दबाव,याचिकाकर्त्यांचा आरोप

January 9, 2017 4:28 PM0 commentsViews:

maratha_morcha banner109 जानेवारी : मराठा क्रांती मोर्चा 31 जानेवारीला निघू नये यासाठी सरकार दबाव आणतंय, असा आरोप मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केलाय.

कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना फासी आणि अॅट्रॅासिटी कायद्या बदल करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात निघालेल्या मराठा क्रांती मोर्च्याचे वादळ अखेर मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपले. दिवाळीमध्ये निघाणारा मोर्चा पुढे ढकलण्यात आला होता. पण आता तो 31 जानेवारीला निघणार आहे. मात्र, या मोर्चाला आता वेगळे वळण लागले आहे.

मराठा मोर्चा 31 जानेवारीला निघू नये यासाठी राज्य सरकार दबाव टाकतंय असा आरोप याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केलाय. सरकार आमच्या मागण्या मान्यही करत नाही आणि मोर्चालाही विरोध करत आहे. काही सहकाऱ्यांवर दबाव टाकून मोर्चा स्थगित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असा आरोप पाटील यांनी केलाय. सरकारने विरोध केला तरीही 31 जानेवारीला मराठा मोर्चा निघणारच असंही पाटील यांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close