काश्मीरमधल्या अखनूरमध्ये अतिरेकी हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू

January 9, 2017 5:17 PM0 commentsViews:

akhnoor-alert-759

09 जानेवारी : काश्मीरमधल्या अखनूरमध्ये दहशतवादी हल्ल्यात ३ जणांचा मृत्यू ओढवलाय. जनरल रिझर्व्ह इंजिनिअर फोर्सच्या छावणीवर सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. यात या पथकामध्ये काम करणारे ३ मजूर मृत्युमुखी पडले. या छावणीच्या जवळ बंदुकीच्या फैरी झाडल्याचे आवाज आल्यामुळे सुरक्षा फौजांनी हा भाग ताब्यात घेतला.

दहशतवाद्यांनी सोमवारी सकाळी ७ वाजल्याच्या सुमाराला अखनूरमध्ये घुसखोरी करून हा हल्ला चढवला. हे दहशतवादी सीमा ओलांडून अखनूरमध्ये घुसले. भारत- पाक सीमेवरच्या बत्ताल भागात हा हल्ला झालाय. जनरल रिझर्व्ह इंजिनिअर फोर्स हा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचाच एक भाग आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close