‘वायफाय’मुळे ‘हायफाय’ होणार मुंबई

January 9, 2017 6:30 PM0 commentsViews:

Free_Wifi_Reuters-624x351

09 जानेवारी : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांना वाय-फायचं गिफ्ट मिळणार आहे. मुंबईतल्या पाचशे ठिकाणी मोफत वायफायची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. मुंबईत सुरुवातीला मुंबईत पाचशे ठिकाणी वाय फाय सुरू करण्यात येणार आहे. मे महिन्यापर्यंत संपूर्ण मुंबईमध्ये वाय फाय कनेक्शन देण्यात येणार आहे.

मुंबईमध्ये 1200 ठिकाणी वायफाय सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. 1 मे 2017 पर्यंत मुंबईत 1200 ठिकाणी वायफाय हॉटस्पॉट सुरू करण्यात येणार आहेत. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ही योजना राबवण्यात येणार आहे. दक्षिण मुंबईत गेट वे ऑफ इंडिया आणि गिरगाव चौपाटीवर याठिकाणांसोबतच मुंबईत ठिकठिकाणी असे वायफाय हॉटस्पॉट विकसित करण्यात येणार आहेत. वायफाय कनेक्शनमुळे मुंबईकरांना वाहतुकीची स्थिती आणि पार्किंगची माहिती त्यांच्या मोबाईल अॅपवर मिळू शकेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close