नोटबंदीच्या विरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर

January 9, 2017 7:52 PM0 commentsViews:

09 जानेवारी : काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसही नोटाबंदीच्या विरोधात रस्त्यावर उतरलंय. राष्ट्रवादीने राज्यभरात रस्त्यावर उतरून सरकारविरोधात निदर्शनं केली. मुंबईत सुनील तटकरे तर पुण्यात अजित पवारांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनात राष्ट्रवादीचे बहुतांश नेते सहभागी झाले होते. पुण्याच्या ग्रामीण भागातल्या मोर्चाचं नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं.

ठाणे, कोल्हापूर, त्र्यंबकेश्वर, परभणी यांसह इतर जिल्ह्याच्या ठिकाणीही राष्ट्रवादीने नोटाबंदीविरोधात रास्तारोको आंदोलन केलं. एकूणच आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रवादीने या मोर्चांच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन केलंय. काँग्रेसने नोटबंदीच्या विरोधात शुक्रवारी अशाच प्रकारे आंदोलन केलं होतं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close