सेनेचा कोल्हापुरात राडा

May 21, 2010 2:49 PM0 commentsViews: 7

21 मे

स्थानिकांना नोकरीत सामावून घेण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरात शिवसैनिकांनी सारस्वत बँकेवर हल्लाबोल केला.

मराठा को-ऑपरेटिव्ह बँक सारस्वत बँकेत विलीन झाल्यानंतर या बँकेच्या कर्मचार्‍यांना कामावरून कमी केले होते. त्यांना सेवेत सामावून घेण्याची निश्चित तारीख देण्याची मागणी शिवसैनिक करत होते.

मात्र बँकेकडून निश्चत तारीख मिळत नसल्याने गोंधळाला सुरूवात झाली. त्यानंतर पोलिसांनी 11 जणांना ताब्यात घेतले आहे.

close