धोनीचा कर्णधार म्हणून आज शेवटचा सामना

January 10, 2017 9:45 AM0 commentsViews:

india-ms-dhoni1231

10 जानेवारी : भारताचा आजपर्यंतचा सर्वोत्तम कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज कर्णधार म्हणून आपला शेवटचा सामना खेळणार आहे.धोनी इंग्लंडविरुद्ध सराव सामन्यात भारतीय ‘अ’ संघाचे नेतृत्व करणार आहे.

मागच्या आठवड्यातच धोनीने टीम इंडियाच्या वनडे आणि टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले होते.धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर तमाम क्रिकेट जगाला धक्का बसला.धोनीच्या राजीनाम्यानंतर विराट कोहली भारताच्या तिन्ही संघांचा कर्णधार बनला आहे.मात्र, आज धोनी भारत ‘अ’ संघाचा कर्णधार म्हणून खेळेल.

भारत आणि इंग्लंडमध्ये १५ जानेवारीपासून 3 टेस्ट मॅचला सुरुवात होत आहे. या सिरीजआधी पाहुणा संघ 2 सराव सामने खेळणार आहे. पहिल्या सराव लढतीत भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व धोनी तर दुसऱ्या सामन्यात अजिंक्य रहाणे कर्णधार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close