जवानाच्या व्हिडिओवर राजनाथ सिंग यांनी दिले चौकशीचे आदेश

January 10, 2017 11:31 AM0 commentsViews:

(LIVE : अपडेट्स )

 

  • ‘तो’ जवान बेशिस्त – बीएसएफ
  • बीएसएफ जवानाचा व्हिडिओ पाहिलाय -राजनाथसिंह ‘गृह मंत्रालयाकडून याप्रकरणी अहवाल मागितलाय’

=========================================================

BSF JAWAN WEB copy

10 जानेवारी : जम्मू काश्मीरमध्ये काम करणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाने सीमेवर जवानांना कशाकशाला तोंड द्यावं लागतंय याचा एक व्हिडिओ पोस्ट केलाय. या जवानाने व्हिडीओद्वारे मांडलेली कैफियत आपण पाहिली असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलंय.गृहमंत्रालय प्रकरणाची सखोल चौकशी करेल आणि दोषींविरूध्द कडक कारवाई करू असं सिंग यांनी सांगितलं.

 

या व्हिडिओच त्याने जवानांच्या स्थितीची कहाणी सांगितलीय. बीएसएफचे जवान तेज बहाद्दूर यादव यांनी तिथलं वास्तव यात दाखवलंय. वरच्या पातळीवर भ्रष्टाचार असल्यामुळे आम्हाला नीट जेवणही दिलं जात नाही, असं त्याने म्हटलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close