‘लवकर पोचण्यासाठी जीव धोक्यात घालू नका’

January 10, 2017 12:27 PM0 commentsViews:

10 जानेवारी : मुंबई पोलिसांच्या रस्ते सुरक्षा सप्ताहाचं उद्घाटन काल अमिताभ बच्चन यांच्या हस्ते झालं.मुंबईच्या नरीमन पाँईट भागात हा कार्यक्रम पार पडला.अमिताभ यांनी मनमोकळेपणानं वाहतूक सुरक्षेबद्दल संवाद साधला.

हल्ली लोक कारमध्ये सेलिब्रेटी दिसले की फोटो काढायचा प्रयत्न करतात आणि यातून अपघातही होतात..कृपया फोटोसाठी किंवा लवकर पोहोचण्यासाठी आपला जीव धोक्यात घालू नका, असं आवाहन बिग बींनी केलं. काही विनोदी किस्सेही त्यांनी सांगितले.

big b on road

याशिवाय कारमध्ये छोट्या मुलांना पुढच्या सीटवर बसवू नका असं कळकळीचं आवाहनही त्यांनी उपस्थितांसमोर केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close