गुंड विठ्ठल शेलार युवा भाजपचा उपाध्यक्ष

January 10, 2017 1:17 PM0 commentsViews:

pune_bjp_gunda_prvesh

10 जानेवारी : पुण्यातल्या मुळशी तालुक्यात खून करून मृतदेह जाळून टाकण्यासाठी कुप्रसिध्द असलेल्या शेलार टोळीचा म्होरक्या विठ्ठल शेलार याला भाजपमध्ये थेट युवा मोर्चाचं उपाध्यक्षपद देण्यात आलं आहे.
विठ्ठल शेलारवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे,पण जामीनावर सुटका झाल्यानंतर थेट भाजपमध्ये युवा मोर्चा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

गिरीश बापटांच्या हस्ते त्याचा ३० डिसेंबरला जाहीर सत्कारही करण्यात आलाय. विठ्ठल शेलारवर दरोडा, गुंड पिंट्या मारणेचा खून, आणखी एक खून करून मृतदेह जाळून टाकल्याचा गुन्हा आहे. ग्रामीण पोलिसांनी त्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाईही केली होती. यापूर्वी शहर भाजपमध्ये अनेक गुंडाना प्रवेश देण्यात आलाय. त्यामुळे सत्तेच्या चाव्या घेण्यासाठी भाजप इतकं बिथरलय का अशी टीका होतेय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close