शस्त्रास्त्रे विकणार्‍यास अटक

May 21, 2010 2:52 PM0 commentsViews: 1

21 मे

एटीएसच्या अधिकार्‍यांनी मुंबईत शस्त्रास्त्र विकण्यासाठी आलेल्या एका तरुणाला अटक केली आहे.

या तरुणांकडे पाच हत्यारे सापडली आहेत. महम्मद इर्शाद हवाई असे या तरुणाचे नाव आहे.

इर्शाद हा मूळचा उत्तर प्रदेशातील लखनौ जिल्ह्यातील आहे. गेल्या काही दिवसांपासून तो मुंबईत राहत होता. तो हत्यारे देण्यासाठी येणार असल्याची माहिती एटीएसच्या विक्रोळी युनिटला मिळाली होती.

त्यानंतर सापळा रचून इर्शादलाअटक करण्यात आली. त्याच्याकडे दोन परदेशी बनावटीची अत्याधुनिक पिस्तुले, दोन रिव्हॉल्वर आणि एक देशी कट्टा सापडला.

close