बार बार ये दिन आये…हॅपी बर्थडे हृतिक!

January 10, 2017 2:08 PM0 commentsViews:

10 जानेवारी : हॅंडसम हंक ह्रतिक रोशनचा आज ४३वा वाढदिवस. त्याची गणना आशियातील अग्रगण्य हॅंडसम व्यक्तींमध्ये केली जाते. २०००साली ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून त्याने अमिषा पटेलसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि त्याच्या नृत्यकौशल्याने सर्वाना वेड लावलं.

अभिनय आणि भूमिकांमधील विविधता हे त्याचं वैशिष्ट्य. मात्र गेले काही दिवस तो विविध वादविवादांत अडकल्याचं पाहायला मिळत्येय. त्याची पत्नी सुझान खानसोबतचे त्याचं वैवाहिक आयुष्य संपुष्टात आलं. अभिनेत्री कंगना राणावतसोबतचं अफेअर आणि त्यानंतरचं बनावट मेल्स प्रकरण यामुळे तो हेडलाईन्समध्ये राहिला.

क्रिश ३ या चित्रपटादरम्यान कंगना आणि हृतिकमधील अफेअरच्या चर्चा माध्यमांत रंगल्या. याबाबत कोणीही काही स्पष्टीकरण दिलं नाही, मात्र अचानक दोघांमधील एक नवीन वाद समोर आला. कंगनाने त्याच्यावर प्रेमात फसवल्याची तक्रार केली. त्याच्याकडून धमकीचे आणि ब्लॅकमेलिंगचे मेल्स येत असल्याची तक्रार तिने आणि तिची बहिण व मॅनेजर रंगोलीने केली. यो वादात त्यांना कोर्टाची मदत घ्यावी लागली. उपलब्ध पुराव्यांतून काहीही निष्पन्न होत नसल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं.

काईट्स या चित्रपटादरम्यान परदेशी अभिनेत्री बार्बरा हिच्यासोबतच्या अफेअरच्या बातम्या माध्यमांत येऊ लागल्या होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर आपटला मात्र त्याच्या वैवाहिक आयुष्यात दरार आणून गेला. नंतर तो बार्बरापासून दुरावला मात्र सुझानशी असलेलं त्याचँ नातं कमजोर झालं.

इतकं असूनही त्यांचं वैवाहिक आयुष्य नीट चालू होतं , मात्र अचानक २०१४मध्ये दोघांनी एकमेकांपासून दुर होण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांना परफेक्ट कपल म्हटलं जायचं त्यामुळे या बातमीने बॉलिवूडला धक्का बसला.

याचसोबत त्याचा सलमानसोबतचा वादही गोजला.हृतिकच्या गुजारीश सिनेमाबाबत केलेल्या विधानामुळे सलमानसोबत त्याची बाचाबाची झाली. हा सिनेमा कुत्राही बघणार नाही , असं सलमान म्हँणाला होता. यानंतर पुढे त्यांनी एकमेकांचा चेहराही बघणं सोडलं.
धूम २ चित्रपटात हृतिकने ऐश्वर्यासोबत काम केलं. त्यात दोघांचे काही बोल्ड सीन होते. त्यातील किसिंग सीनवर बच्चन कुटुंबियांचा आक्षेप होता. तो सीन काढण्याची विनंतीही कुटुंबियांकडून करण्यात आली होती.

आता 25 जानेवारीला हृतिक रोशनचा काबील सिनेमा रिलीज होतोय.त्यात त्यानं अंध व्यक्तीची भूमिका केलीय.

बॉलिवूडच्या या अष्टपैलू अभिनेत्याला आणि अप्रतिम डान्सरला आमच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close