पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार ?

January 10, 2017 5:21 PM0 commentsViews:

Arvind Kejriwal

10 जानेवारी :  अरविंद केजरीवाल हेच पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, असं समजा, असं आम आदमी पक्षाने म्हटलंय. पंजाबमधल्या मोहालीतल्या सभेमध्ये आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनीच हे जाहीर केलंय. तुम्ही मतदान करताना अरविंद केजरीवाल यांच्यासाठीच मतदान करा, असं आवाहन मनीष सिसोदिया यांनी केलं.

आम आदमी पक्ष पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी कुणाचंही नाव घोषित करणार नाही, असं अरविंद केजरीवाल यांनी 4 जानेवारीच्या सभेत म्हटलं होतं. पंजाबमध्ये निवडून आलेले आमदारच मुख्यमंत्री ठरवतील, असंही केजरीवाल म्हणाले होते. पण आता मात्र मनीष सिसोदिया यांनी अरविंद केजरीवाल हेच पंजाबमधल्या निवडणुकीचा मुख्य चेहरा असतील, असं म्हटलंय.

पंजाबमध्ये 4 फेब्रुवारीपासून मतदानाचे टप्पे सुरू होतायत. पंजाबप्रमाणेच गोव्यामध्येही आम आदमी पक्ष जोरदार तयारीने निवडणूक लढवतोय. गोव्यामध्ये आम आदमी पक्षाने माजी पोलीस अधिकारी एल्विस गोम्स यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलंय. आणि आता अरविंद केजरीवाल दिल्लीपेक्षा पंजाबमध्येच आपंल लक्ष केंद्रित करतील, अशी चिन्हं आहेत. पंजाबमध्ये 117 जागांसाठी विधानसभा निवडणुकांचं मतदान होतंय. या निवडणुकांचा निकाल 11 मार्चला येणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा