आगाऊ तरुणाला सुषमा स्वराज यांचा ट्विटरवरून इंगा

January 10, 2017 2:43 PM0 commentsViews:

SUSHMA

10 जानेवारी : ट्विटरवरुन लोकांच्या अडचणी सोडवणाऱ्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी याच ट्विटरचा वापर करून एका आगाऊ पुणेकराला इंगा दखवलाय.

परदेशी प्रवासात भारतीयांना येणाऱ्या अडचणी ट्विटरच्या माध्यमातून कळल्यावर सुषमा स्वराज त्यांचा नेहमीच पाठपुरावा करतात. याचाच गैरफायदा घेऊन पुण्याच्या एका आयटीतल्या तरुणानं झांशी रेल्वेमध्ये काम करणाऱ्या आपल्या पत्नीची पुण्यात बदली करा अशी विनंती सुषमा स्वराज यांना केली.त्याला सुषमांनी ट्विटरवरुनच चांगला हिसका दाखवला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close