पेट्रोल महागणार 6 रुपयांनी

May 21, 2010 3:20 PM0 commentsViews: 2

21 मे

पेट्रोलच्या किंमती आता पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांनी तसे संकेत दिले आहेत.

त्यांचा म्हणण्यानुसार पेट्रोल, डिझेलच्या सध्याच्या किंमती स्थिर ठेवणे सरकारला आता शक्य नाही.

करण थापर यांनी घेतलेल्या खास मुलाखतीत मुखर्जी यांनी ही बाब स्पष्ट केली आहे.

पेट्रोलचे दर 6 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

ही दरवाढ झाल्यास देशाच्या प्रमुख तीन शहरांत पेट्रोलचे दर कसे असतील, त्यावर एक नजर टाकूयात…

दिल्ली – 47 रुपये लीटरच्या पेट्रोलसाठी 53 रुपये मोजावे लागतील

कोलकाता – 51 रुपये लीटरच्या पेट्रोलसाठी 57 रुपये मोजावे लागतील

मुंबई – 52 रुपये लीटरच्या पेट्रोलसाठी 58 रुपये मोजावे लागतील

close