बस,रेल्वे,मेट्रो,विमान… एकाच ठिकाणी! सरकारचा नवा प्रकल्प

January 10, 2017 5:05 PM0 commentsViews:

FOR WAB

10 जानेवारी,कौस्तुभ फलटणकर:शहरात एकाच ठिकाणी बस,रेल्वे,विमान आणि मेट्रोचं स्टेशन असलं तर प्रवासातील किती कटकटी दूर होतील नाही ? दिल्ली,मुंबई ,पुण्यासारख्या मोठ्या आणि वर्दळीच्या शहरात राहणाऱ्यांसाठी तर ही कल्पनाच सुखावणारी आहे.पण आता ही फक्त कल्पना राहणार नाहीये तर लवकरच हे वास्तवात उतरणार आहे.

देशात वेगवेगळ्या शहरात इंटर मॉडेल स्मार्ट स्टेशन उभारण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे . यासाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून नागपूर आणि वाराणसी ही दोन शहरं निवडली आहेत . या योजनेअंतर्गत नागपूरजवळ तीन जागांची पाहणी करण्यात आली आहे ज्यात खापरी,गुमगाव आणि अजनी या तीन जागांची पाहणी करण्यात आली आहे.यापैकी खापरीला हे स्मार्ट स्टेशन उभारलं जाईल.याच स्टेशनवर रेल्वे,एसटी ,मध्यप्रदेश ट्रान्सपोर्टच्या बसेस ,शहर बस ,मेट्रो आणि विमानतळाला जाण्याचा मार्ग असेल.

केंद्र सरकारच्या अभ्यासात आढळले आहे की शहरांमध्ये वाढती ट्रॅफिक गजबज कमी करायची असेल तर स्टेशन जोडणे आवश्यक आहे .कुठल्याही शहरात रेल्वे आणि विमानाने साधारण तीस टक्के लोक असे उतरतात ज्यांना वाहन बदलून शहराबाहेर जायचं असतं . पण स्टेशन जोडले नसल्याने या लोकांचा भार शहराच्या ट्रॅफिकवर येतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ही योजना अतिशय आवडली असून नागपूरसारख्या शहरात चार हजार प्रवासी प्रवास करणाऱ्या विमानतळाला चार हजार कोटी ,आणि एक लाख प्रवासी प्रवास करतात त्या स्टेशन्सचा विकास नाही ही गोष्ट मोदींना खटकली आणि तिथून ही संकल्पना पुढे आली आहे . नागपूर आणि वाराणसी स्टेशनचा प्लान तयार झाला असून लवकरच त्याला केंद्र आणि राज्य मंत्रिमंडळात मंजूर केलं जाईल.

साधारण पाच लाख लोक एकाच वेळी सहज प्रवास करू शकतील आणि त्यांना सगळ्या सोयी सुविधा या स्टेशनवरच दिल्या जातील. नागपूर आणि वारणासी नंतर देशात इतर दीडशे शहरात ही योजना अमलात आणण्याची सरकारची तयारी आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात आली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close