भाजप – शिवसेना युतीचं काय होणार ?

January 10, 2017 7:23 PM0 commentsViews:

10 जानेवारी - महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर आल्यायत. पण अजूनही भाजप- शिवसेना युतीबद्दल अनश्चितता आहे. युती करायची काही नाही याबद्दल भाजप आणि शिवसेनेच्या गोटात खलबतं सुरू झालीयत. भाजपच्या राज्य कार्यकारिणीची 12 जानेवारीला बैठक होतेय. त्यावेळी जिल्हा पातळीवरून आलेल्या युतीच्या प्रस्तावावर कोअर कमिटीत चर्चा होईल.

BJP- Sena Banner

युतीबद्दल चर्चा करण्यासाठी बुधवारी विविध जिल्ह्यांत भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची प्राथमिक बैठक होतेय. युतीबद्दल शिवसेनेच्या काय अपेक्षा आहेत याची माहिती स्थानिक नेते भाजप कोअर कमिटीला कळवणार आहेत.  जिल्हा पातळीवर आणि महापालिका क्षेत्रात भाजप- शिवसेनेच्या नेत्यांची बैठक होणार आहे.

मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे मुंबई भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. महापालिका आणि जिल्हा परिषद यासाठी युती करायची का? याबद्दल स्थानिक पातळीवर प्राथमिक चर्चा होईल. स्थानिक पातळीवर चर्चा झाल्यावर शिवसेनेच्या अपेक्षित जागांची माहिती घेतली जाईल.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी युतीवरून भाजपला इशारा दिलाय. निवडणूक आयोग निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याआधी तरी युतीचं काय ते स्पष्ट करा, असं उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close