उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंच्या प्रस्तावाला हात जोडून नमस्कार!

January 10, 2017 7:46 PM0 commentsViews:

Uddhav raj new
10 जानेवारी :  मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेकडून युतीचा प्रस्ताव आला तर विचार करू, अशी भूमिका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलीय. मात्र शिवसेना मनसेच्या या प्रस्तावावर फारशी गंभीर दिसत नाही. उद्धव ठाकरेंना याबाबत प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी हात जोडून नमस्कार करत शिवसेनेची भूमिका काय असेल याचे संकेत दिले.

राज यांनी युतीसाठी भाजप आणि शिवसेना अशा दोघांसाठीही दारं खुली असल्याचे संकेत दिले होते. पण उद्धव ठाकरे मात्र राज यांच्या प्रस्तावावर काहीही बोलले नाहीत. मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर असताना मनसेच्या इंजिनाला अजूनही निश्चित दिशा मिळालेली नाही. राज ठाकरेंनी आता कुठे आपले पत्ते उघडे करायला सुरुवात केलीय.

भाजप किंवा शिवसेनेकडून युतीचा प्रस्ताव आला तर विचार करू, असं राज ठाकरे म्हणाले खरे पण उद्धव ठाकरे मात्र राज ठाकरेंच्या युतीच्या आवतणाबद्दल फारसे उत्सुक नाहीत हेच यावरून स्पष्ट होतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close